दगड आणि हाडे
उत्क्रांती विरुच्द्ध सबळ पुरावे
उत्क्रांती हे विज्ञान आणि सृष्टी उत्पत्ती ही एक धर्मश्रद्धा असेच आहे ना?
ही सर्वसाधारण कल्पना खरी असेल तर आज कित्येक उच्चविद्याविभूषितं वैज्ञानिकांनी उत्क्रांतीचे तत्त्व नाकारून या कृतीशील जगाची थेट निर्मिती झाली आहे हे यहूदीख्रिस्ती शाख्लेखातील उत्पत्तीच्या पुस्तकातील सत्य मत का स्वीकारले आहे ? (उत्क्रांती म्हणजे अतिशय साध्या जीवांपासून संथपणे स्वयं-रूपांतर होऊन सर्व जीवसृष्टी उत्क्रांत झाली अशी कल्पना, खरे तर आज ‘सृष्टी ईश्वर निर्मिती’आहे ही आधुनिक चळवळ चांगलीच वाढते आहे.
एकट्या अमेरिकेतच मध्यम अंदाजानुसार १०,००० पेक्षा अधिक व्यावसायिक वैज्ञानिक पवित्र शास्त्रातील सृष्टीनिर्मितीवर क्थ्चास ठेवतात. (यांच्यापैकी बहुसंख्य शास्त्राज्ञांचा कोणत्याच ‘सृष्टीनिर्मिती’संबंधी विचार करणाऱ्या संस्थांशी अधिकृतपणे संबंध नाही.) दक्षिण कोरिया देशात १९९३ मध्ये द कोरिया असोसिएशन ऑफ क्रीएशन रिसर्च या संस्थेचे १००० पेक्षा जास्त वैज्ञानिक सभासद होते. त्यातील बहुसंख्य व्यक्तींनी विज्ञानाच्या कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी पदवी संपादन केली होती. त्यांच्यापैकी १०० जण विद्यापीठात सुप्रतिष्ठित प्राध्यापक होते. काही काळापूर्वी मॉस्को क्रोएशन सायन्स फेलोशिप ही संस्था स्थापन झाली तेव्हा तिचे फक्त दहा सभासद होते. पुढे एकाच वर्षानंतर या संस्थेत प्रगत वैज्ञानिक पदव्या घेतलेले १२० सभासद आले.

विद्यापीठातील बहुतेक प्राध्यापकांनी एकतरी पीएच. डी पदवी संपादन केलेली असते. पण सृष्टीची ईथवरी निर्मिती या चळवळीच्या सभासदांनी अशा एकापेक्षा अधिक पदव्या संपादन केलेल्या असतात. (उदा. स्व. प्रा. ए. इ. वाईल्डर-स्मिथ ह्यांनी अशा तीन पदव्या घेतल्या होत्या.)
पण विज्ञानात … ?
काहीतरी घडताना पाहणे, त्याचे मोजमाप करणे आणि पुन्हा तेच करून बरोबर आहे का ते तपासून पाहणे हाच विज्ञानाचा पाया आहे. समजा सरपटणारे प्राणी लक्षावधि वर्षापूर्वी बदलले, त्याचा क्रमविकास होऊन त्यांचे रूपांतर पक्ष्यांमध्ये झाले हे उत्क्रांतीवाद्यांचे मत वादासाठी मान्य केले तरी वैज्ञानिक पद्धतीने हेच सत्य आहे असे सिद्ध करता येत नाही. कारण हा बदल होताना कोणी प्रत्यक्ष पाहिलेला नाही आणि समजा एखादा सरपटणारा प्राणी घेऊन त्यांचे रूपांतर पक्ष्यांमध्ये करणे कसेतरी साधले तरीपण हीच गोष्ट लक्षावधी वर्षांपूर्वी घडली असे त्यावरून सिद्ध करता येत नाही. त्याचप्रमाणे पक्षी व सरपटणारे प्राणी यांच्या अनेक समूहाची निर्मिती देवाने केली व प्रत्येक जीवाने आपआपल्या प्रकाराप्रमाणे पुनरूत्पत्ती करावी असे लावून दिले-तशीच अद्भुत उत्पत्ती आम्हांला पाहता यावी म्हणून आता पुन्हा करून दाखवावी असा आग्रह धरता येणार नाही.
हे दोन्ही विचार विश्वासावर आधारलेले आहेत आणि या प्रत्येक विश्वासप्रणालीमध्ये (सृष्टी निर्मिती किंवा उत्क्रांती) त्या त्या विधासमताला सबल आधार देण्यासाठी प्रमाणांनी, प्रतिपादन केलेले असते. सृष्टी ईश्वरनिर्मित आहे या मताचे पुरस्कर्ते आहेत ते म्हणतात आमची विश्वासप्रणाली बुद्धीला पटणारी आणि तर्कशुद्ध आहे; आणि सध्याच्या काळी दिसून येणाऱ्या पुराव्यांचा त्याला भरपूर आधार आहे.
सृष्टी ईश्वरनिर्मित आहे असे मानणार्या लोकांकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत का?
नाहीत. सृष्टी ईश्वर निर्मित आहे या मताचे प्रतिपादन करताना काही समस्यांची उकल होत नाही, काही प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात. पण उत्क्रांतीमतामध्येही अगदी असेच आहे. नाहीत. सृष्टी ईश्वर निर्मित आहे या मताचे प्रतिपादन करताना काही समस्यांची उकल होत नाही, काही प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात. पण उत्क्रांतीमतामध्येही अगदी असेच आहे.
उत्क्रांतीच्या संबंधातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लोकांच्याकडून कररूपाने येणाऱ्या पैशातून प्रतिवर्षी अब्जावधि डॉलर्स खर्च केले जातात. त्या मानाने सृष्टी ईश्वरनिर्मित आहे या विषयीच्या संशोधनावर होणारा खर्च अगदी नगण्यच म्हणावा लागेल.
उत्क्रांतीच्या संबंधातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लोकांच्याकडून कररूपाने येणाऱ्या पैशातून प्रतिवर्षी अब्जावधि डॉलर्स खर्च केले जातात. त्या मानाने सृष्टी ईश्वरनिर्मित आहे या विषयीच्या संशोधनावर होणारा खर्च अगदी नगण्यच म्हणावा लागेल.
तथापि गेल्या काही वर्षामध्ये सृष्टी ईश्वरनिर्मित आहे या तत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या विद्वानांनी सकृतदर्शनी अवघड वाटणाऱ्या काही समस्या सोडवल्या आहेत. (आणि हे करताना त्यांना या समस्यांच्या संबंधात पूर्वी मांडलेले विचार व मते एकतर बदलावी लागली किंवा सोडावी लागली. पण विज्ञानामध्ये हा प्रकार अगदी नेहमी होत असतो.)
उत्क्रांती म्हणजे एक सिद्ध नाकरता येणारे (म्हणजे धार्मिक) विश्वासमत. निसर्गातील सर्वच गोष्टींनी स्वतःच्या स्वाभाविक गुणधर्मांच्या साहाय्याने, कोणत्याही अलौकिक शक्ती शिवाय स्वतःच स्वतःची जडणघडण करून घेतली आहे असे हे मत सांगते. सर्व विसंगत अव्यवस्था आपल्या आपण सुसंगत व्यवस्था झाली. अणू-रेणू कणांतून ग्रहतारे साकारले, विविध वृक्ष वाढले. पक्षी, प्राणी आणि लोक त्यांतूनच आले. या कामी वस्तु आणि ऊर्जा यांच्या गुणधर्माखेरीज इतर कोणत्याही “बाह्य शक्तीची” मदत घेतली नाही. अर्थात हे सर्व कसे घडले असावे ते स्पष्ट करणारे सिद्धान्त (म्हणजेच उत्क्रांतीची यंत्रणा) पुढे येतात आणि मागे पडतात. परंतु हे सर्व कसेतरी घडून आलेच हा त्यामागचा विश्वास आज अनेकांच्या दृष्टीने अविचल असाच आहे.
काही लोक या प्रकारच्या प्रक्रियेत एखाद्या देवाचे अंग होते असे दाखवण्याचा यत्न करतात परंतु उत्क्रांतीसिद्धान्तवादी लोकांना मात्र हे मान्य नाही. या प्रक्रियेला कोठून तरी बौद्धिक दिशा मिळाली असावी असे म्हणणारे कोणतेच मत त्यांना मान्य नाही. तसेच “आस्तिकमताचे उत्क्रांतीवादी” अनेक वैज्ञानिक आहेत (उत्क्रांती आणि देव या दोहोंवर आपला विश्वास आहे असे हे म्हणतात) त्यांच्या मते ही सर्वच प्रक्रिया अगदी स्वाभाविक होती. उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार ही “निर्मिती प्रक्रिया अब्जावधि वर्षांच्या कालात घडली असे मानतात आणि या प्रक्रियेत असंख्य जीवांनी जगण्यासाठी धडपड केली; दुःखे, वेदना भोगल्या आणि ते मेले. यात बळी तो कान पिळी या न्यायाने सबलांनी दुर्बलांची नावनिशाणी अनेकवार पुसून टाकली.
हा विचारविवाद महत्त्वाचा का आहे?
१. उत्क्रांतीवादामुळे नास्तिकतेचे समर्थन होते
देव नाहीच असे आग्रही मत मांडणारा प्रत्येकजण उत्क्रांतीचा आधार घेऊनच कोणत्याही रचनाकाराशिवाय निसर्गसृष्टी अस्तित्वात आली अरे प्रतिपादन करतो. नास्तिकमत, अज्ञेगवाद यासारखे जीवनविषयक दृष्टिकोन, अनेक धर्ममते आणि यांच्याशी नाते सांगणारा ऐहिक मानवतावाद या सर्वांना आपल्या समर्थनासाठी हाच आधार आवश्यक वाटतो. “आम्हांला कोणीच निर्माण केले नाही तर कोणीच आमचा धनी नाही म्हणून जे काही नियम करायचे ते आमचे आम्हीच करणार. तसा अधिकार दुसऱ्या कोणालाच नाही.” हे तर यातील बहुतेकांचे ब्रीदवाक्य आहे. उदाहरणार्थ जुन्या करारातील बुहतेक भाग ‘सांस्कृतिक मिथकथा’ म्हणून नाकारले तर मग दहा आज्ञांतील तत्त्वांचे बंधन पाळण्याचे कोणतेच संयुक्तिक कारण उरत नाही.
२. ख्रिंस्तीत्वाच्या विरूद्ध
पवित्र शास्त्र हे सृष्टी निर्माणकर्त्याने स्वतः केलेले पवित्र प्रकटीकरण आहे असा खिस्ती लोकांचा ठाम विश्वास आहे. पवित्र शास्त्रामध्ये स्वतःला सातत्याने प्रकट करणाऱया देवानेच चांगले जग निर्माण केले असे तेथे अथपासून इतिपर्यंत सांगितले आहे. (या जगात मरण, कलह, भांडणे, हिंसा, क्रूरता आणि रक्तपात काहीच नव्हते) पहिला मानव आदाम ह्याने त्याच्या निर्माणकर्त्याविरूद्ध बंडखोरी (पाप) केले. त्याचा परिणाम म्हणून देवाने या भूमीला शाप दिला आहे (उत्पत्ती ३, रोम. ८).


तथापि मरण, दुःख, वेदना वगैरेंचा हा शिरकाव केवळ तात्पुरता विक्षेप असाच आहे. कारण हे जग पुन्हा पूर्वस्थितीला आणले जाणार आहे (प्रे. कृ. ३:२१). ते परत अब्जावधि वषांच्या मृत्यू, क्रूरता, रक्तपात या अवस्थेप्रत नव्हे तर पापरहित, मरणरहित अवस्थेप्रत प्रस्थापित हीणार, कारण आरंभी ते असेच होते. विश्वास ठेवणार्या पापी मनुष्यजातीचा उद्धार करावा, त्यांना पूर्वस्थितीवर आणावे एवढेच नव्हे तर पहिल्या आदामाने आपल्या करणीने आणलेल्या मरणाच्या व रक्तपाताच्या शापापासून संपूर्ण भूमीच अखेर मुक्त करावे यासाठी देहधारण केलेल्या, निर्माणकर्त्या येशू ख्रिस्ताने (शेवटला आदाम) मरण पावून आपले निर्दोष रक्त सांडले.
— उत्क्रांतीमताची कथा खरी असेल तर या सुवार्तासंदेशातील मुख्य-मुद्दाच हरवून जातो; कारण मग आदामाचे पूर्वज त्या रक्तपाताच्या जगात एकमेकांचे वाभाडे काढून परस्परांची डोकी फोडून मरणवश होत असणार आणि खरोखरी, विशिष्ट काळी, विशिष्ट स्थळी आदामाचे पतन झाले त्या योगे सृष्टीवर शाप आला हा सर्वच विचार केवळ कपोल कल्पित आहे असे होईल.
लोकांना त्यांच्या निर्माणकर्त्याबरोबर सदासर्वकाळ सहभागिता पुन्हा मिळेल हे येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचे सत्य आमच्या पूर्वजाने, आदामाने बंडखोरी केली, देव आणि मानव ह्यांच्यामधील मूळचा सुसंगत ताळमेळ कसा मोडला या दु्वर्तिच्या सत्यावर आधारित आहे. (शकरिंथ.१५:२१-२२ या वचनांमध्ये आदामाने मरण आणले त्याकडे सुवार्तेचा संबंध निरपवादपणे जोडला आहे. “कारण (अ) मनुष्याच्याद्रारे मरण आहे, म्हणून (अ) मनुष्याच्याद्रारे मेलेल्यांचे पुनरूत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्िस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील) सर्वच दृष्टीने पाहता ‘उत्पत्ती’ विषयी शंका घेतल्याने अधिकाअधिक लोक पवित्र शास्त्राच्या उरलेल्या भागाविषयीही शंका घेऊ लागले आहेत.
सर्व काही सहा दिवसांमध्ये खरोखरी उत्पन्न केले असे आम्हांला सांगण्यासाठी उत्पत्तीचे पुस्तक लिहिले आहे हे आम्ही कसे समजावे — याचा दुसरा काही अर्थ असेल का?
अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर उत्पत्तीचे पुस्तक लिहिण्याचा उद्देश वास्तव इतिहास सांगणे यापेक्षा काही वेगळा होता असे म्हणणे आता शक्य नाही. हिब्रू भाषेचा सखोल अभ्यास करणाऱ्या आघाडीच्या जगप्रसिद्ध विद्वानांपैकी 1 एकाचे मत असे आहे की हिब्रू भाषेचे जागतिक दर्जाचे जेवढे म्हणून त्यांच्या परिचयाचे प्राध्यापक विद्यापीठामध्ये आहेत त्या सर्वांचे एकमत आहे ते असे : सहा सर्वसाधारण दिवसांमध्ये खरोखरी, सर्व वस्तूंची उत्पत्ती झाली आणि सर्व पृथ्वी व्यापणारा महाजलप्रलय झाला हे सांगण्यासाठीच उत्पत्ती १-११ हे अध्याय लिहिले आहेत.
पण या प्राध्यपकांचा त्यावर निश्चित विश्वास आहे असा याचा अर्थ नाही. अर्थ आहे तो एवढाच की लेखकाचा याहून दुसरा कोणताच उद्देश असणे शक्य नाही हे उत्पत्तीच्या पुस्तकातील भाषेवरून स्पष्ट होते. तेथे सांगितले आहे ते त्याच वास्तविक अर्थाने — त्याचा दुसरा अर्थ होत नाही आणि हा वृत्तांत वाचणाऱ्या लहान ८-१० वर्षाच्या प्रत्येक मुलाला तो अर्थ उघडच समजतो.
आपण स्पष्टपणे बोलू. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या अर्थासंबंधाने ज्या इतर कल्पना पुढे येतात त्या नेहमीच पवित्र शास्त्राच्या आधारे येत नाहीत तर इतर मते, यांच्याशी पवित्र शास्त्राचा मेळ घालण्याच्या खटाटोपातूनच या कल्पना येतात. (जसे भूरचना दीर्घकाळयुगेच्या युगे होत होती हे मत)
फक्त एकच मिनिट
तुम्ही म्हणाल, आदामाच्या पूर्वी मरण आणि रक्तपात हे नव्हते, तर सर्व जगभर पाण्यामुळे जमा झालेले खडकांचे, दगडाचे थर व त्यात आढळणारे अब्जावधि मृतजीवांचे पुरलेले अवशेष यांचे काय?
आता नोहाच्या काळी जलप्रलय झाला, सर्व पृथ्वीचा पाण्याने नाश झाला हे पवित्र शास्त्राचे म्हणणे सत्य आहे तर तुम्हांला अशीच परिस्थिती आढळणार नाही का? या जीवाश्मांवरून (वनस्पती/प्राणी यांचे पाषाणात राहिलेले अवशेष- जीवाश्म) ती सर्व झपाट्याने पुरली गेली असेव दिसते. बहुतेक लोकांना वाटते तसे ही मरण्या-पुरण्याची प्रक्रिया अतिशय संथपणे झालेली नाही.




उदाहरणार्थ अशा जीवाश्मात आढळलेले व सुस्थितीत असलेले कोट्यावधि मासे जतन केलेले आहेत. त्यांचे खवले, कल्ले आणि डोळ्यांच्या खोबणी हे आजही स्पष्टपणे दिसते. निसर्गात आपण पाहतो की मासा मेला रे मेला की घारी, कावळे ते फाडून खातात आणि उरलेला भाग ताबडतोब सडून जातो. आता हे मासं ताबडतोब पुरले गेल, त्यांच्या भोवतालचा गाळ, चिखल, वाळू शक्य त्या त्वरेने कडक झाली म्हणूनच त आज अशा अवस्थेत भगर्भात सापडतात. एरवी ते शक्यच नव्हते
पण दलदलीच्या प्रदेशात लक्षावधि वर्षांच्या काळात संथ गतीने दगडी कोळसा तयार झाला नाही का?
जे पुरावे उपलब्ध आहेत ते सर्वच दगडी कोळसा झपाट्याने आकारास आला असेच दाखवणार आहेत. प्रचंड मोठ्या जंगलातील झाडे उन्मळून खाली पडली आणि मग ती झपाट्यान जमीनीत पुरली गेली. व्हिक्टोरिया (ऑस्ट्रेलिया) येथील यॅलान या ठिकाणी तपकिरी रंगाच्या दगडी कोळशाचे मोठ मोठ विशाल थर आढळतात. त्यात पाईन वृक्षांचे अनेक सोटच्या सोट कोळसा झालेले दिसतात. अशी झाडे आज दलदलीच्या प्रदेशात कोठेच आढळून येत नाही
तपकिरी रंगाच्या या दगडी कोळशांच्या थरांचे व्यापक प्रमाणावर कित्येक मैल परिसरात परिक्षण केले तो त्यात ५०% पर्यंत परागांचे जाड थर आढळून आले. त्यातून हे कोळशाचे थर, ही झाडे पाण्यातून वाहून येऊन पुरली गेल्याने तयार झाले हेच अचूकपणे दिसते. दक्षिण गोलार्धातील दगडी कोळशांच्या अनेक खाणीत ही जंगले पूर्वी जेथे वाढली असे म्हणतात त्या अश्मीभूत जमीनीचा मागमूस लागेल असे कोणतेच चिन्ह दिसत नाही.2
अमेरिकेतील ऑर्गोन नॅशनल लॅबोरेटरी येथील संशोधकांनी एक प्रयोग केला त्यांनी साधे लाकडाचे तुकडे घेतले. त्यात आम्ल मिश्रित माती व पाणी घातले व हे सर्व मिश्रण २८ दिवसपयंत १५० अंश सेल्सियस तपमानावर एका बंद क्वार्टझ मालिकेत तापवले त्यातून त्यांना उत्तम दर्जाचा काळा दगडी कोळसा मिळाला. असा कोळसा तयार होण्यास लक्षावधि वर्षांचा काळ जावा लागत नाही! कोळशाच्या खाणीतील कोळशाच्या थररेषांना शाखा फुटतात. (आकृती पाहा) त्या एकमेकांशी ‘£’ या इंग्रजी आकारात जुळतात.


आकृतीतील कोळशाच्या थरांच्या शाखाZ आकाराप्रमाणे जुळलेल्या दिसतात. (यॅऊम ओबेरहॉसन् ड्वूर्डस बर्ग ) बाखयन १९६६ यांचा संदर्भ (डॉ. ज्योयाकिम शकेव्हन् यांच्या सौजन्याने) हे थर लक्षावधि वर्षांच्या अंतरअंतराने दलदलीच्या प्रदेशातून झालेले आहेत असे म्हणण्यास काव आधार आहे?
सर एडवर्थ डेव्हिड या सुप्रसिद्ध भूवैज्ञानिकाने आपल्या १९०७ च्या अहवालात दगडी कोळसामय झालेल्या झाडांच्या उभ्या बुंध्याचे वर्णन केले आहे. (पृष्ठ ९ वर दाखवलेल्या अनेक स्तरीय वृक्ष पाषाणांसारखेच हे अवशेष होते) हे कोळसामय झालेले वृक्षांच्या बुंध्याचे खालचे भाग न्यू कॅसल (ऑस्ट्रेलिया) येथील काळ्या कोळशाच्या थरात असून मग ते मधल्या सर्व थरांतून अगदी वरच्या बाजूच्या थरापर्यंत भेदून आले आहेत.
आता दोन वेगवेगळ्या दलदलीच्या प्रदेशात कितीतरी काळ गेल्यानंतर या प्रकारच्या कोळसा संथ प्रक्रियेने तयार झाला आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करून पाहा. ‘संथ व क्रमशः घटना घडल्या’ या पक्षपाती मताचा अवलंब केल्याने दगडी कोळशाची उत्पत्ती कशी झाली ते उघड दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. मोठमोठ्या जंगलातील सर्वच्या सर्व झाडे वगैरे अचानक उन्मळून पडली. त्याला कारण प्रचंड वेगाने -आलेला पाण्याचा लोंढा.3
प्रचंड वेगाने येणार्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अल्पकाळातच भूपृष्ठावर भरपूर उलथापालथ होते हे खरे आहे. पण लोकांना वाटते भूरचना बदलण्यास लक्षावधि वर्षांचा काळ लागला. पुढील छायाचित्रात (पृष्ठ उजवीकडचे चित्र) दुपार ते सायंकाळ एवढ्या काळात सात मीटर (२५ फूट) पेक्षा उंच एवढा गाळाचा खडक थराथरांनी तयार झाल्याचे दिसते.


वॉशिग्टन स्टेट, युएसाए अमेरिका येथे १९८० मध्ये माऊंट सेंट हेलेन्स या ज्वालामुखीचा स्फोट झाला. त्या उलथापालथीत हा गाळाचा खडक तयार झाला. या ज्वालामुखीचा स्फोट झाला. ( आणि त्यानंतर असे स्फोट होत राहिल) तेव्हा कडे कोसळण, चिखलाचे प्रवाह वाहणे व असेच भूरचनेत उलथापालथ होण्याचे प्रकार घडले. त्या आरंभीच्या स्फोटानंतर सुमारे १८० मीटर (६०० फूट) पेक्षा अधिक उंचीचे थराथरांनी बनलेले गाळाचे खडक अस्तित्वात आले.
चिखलाच्या वेगवान प्रवाहामुळे एक दिवसातच तीस मीटर (१०० फूट) खोलीची दरीवजा खिंड अगर दरा आकारास आला.4 (डावीकडचे छायाचित्र पाहा)
काही तज्ज्ञ आता असे म्हणतात की अमेरिकेतील ग्रॅड कॅन्यन ही प्रचंड दरी अचानक आलेल्या नैसर्गिक अरिष्टातून अशाच प्रकारे तयार झाली आहे, (पण ते तरीही ही प्रक्रिया लक्षावधि वर्षांच्या काळात झाली असा आग्रह धरतात). खरे तर कोलॅरॅडो नदीच्या प्रवाहामुळे लक्षावधि वर्षांच्या काळात अतिसंथ गतीने ही प्रक्रिया झालेली नाही.
जीवाश्म अवशेषातून उत्क्रांती झाल्याचे प्रमाण मिळते का?
डार्विन ह्याने अगदी अचूकपणे म्हटले होते की त्याने केलेले प्रतिपादन खरे असेल तर अधल्या-मधल्या टप्प्यातील जीवांचे अवशेष बहुसंख्येने आढळून आलेच पाहिजेत. उदाहरणार्थ; सरड्यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या पुढच्या पायांचे रूपांतर पंखांमध्ये झाले आहे. तर पाय ते पंख या रूपातंराच्या सर्व अवस्था दाखवणारे जीवाश्म अवशेष आपल्याला का आढळत नाहीत? खरेतर अर्धवट पाय, अर्धवट पंख, अर्धवट खवले, अर्धवट पिसे अशासारख्या या अवस्था असणे व दिसणे जरूर आहे.
डार्विनने म्हटले होते की अशा मध्यावस्थेतील अवशेष न मिळणे हा त्याच्या “प्रतिपादनाचे विरूद्ध मोठाच उघड दिसणारा गंभीर आक्षेप आहे.” यानंतर बरोबर एकशेवीस वर्षांनी, अमेरिकेतील एका मोठ्या वस्तुसंग्रहालयाचे प्रमुख डॉ. डेव्हिड रॉप ह्यांनी उत्क्रांती स्थित्यंतरातील हरवलेल्या दुव्यांच्या बाबतीत अद्याप “जैसे थे परिस्थिती आहे” असे म्हटले पुढे ते आणखी म्हणतात, “उत्क्रांती मार्गाने होणाऱ्या बदलांची उदाहरणे डार्विनच्या काळात आढळली त्यापेक्षा आज अगदीच नगण्य म्हणावी इतकी कमी आढळतात.”5
डॉ. कॉलिन पॅटरसन हे ब्रिटिश म्युझियमच्या नैसर्गिक इतिहास या विभागात वरिष्ठ जीवाश्म तज्ज्ञ आहेत. ते उत्क्रांतीवादी असून प्राचीन अवशेषांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांनी उत्क्रांती या विषयावर एक महत्त्वाचे पुस्तक लिहिले. नंतर कोणीतरी त्यांना विचारले, “काय हो, तुमच्या या पुस्तकात तुम्ही रूपांतर होतानाच्या मधल्या अवस्थांची चित्रे का दिली नाहीत?” तेव्हा त्यांनी त्याला असे लिहून कळवले:6
“माझ्या पुस्तकामध्ये उत्क्रांतीच्या रूपांतर अवस्था दाखवणारी थेट प्रमाणित चित्रे, आकृत्या यांची उणीव आहे हे तुमचे म्हणणे मला पूर्णतः मान्य आहे. पण असे गत अवशेष व जिवंत उदाहरणे मला माहीत असती तर मी नक्कीच त्यांचा समावेश केला असता. तुम्ही म्हणता या बदलाच्या मधल्या अवस्था दाखवण्यासाठी एखाद्या चित्रकाराची मदत घ्यावी. पण त्याला तरी ही सर्व माहिती कोठून आणि कशी मिळणार खरे सांगायचे तर ती माहिती देणे मला शक्यच नाही. आणि सर्व काही चित्रकाराच्या कल्पनाशक्तीवर सोपवून द्यायचे तर त्यामुळे वाचकांची दिशाभूल होणार नाही काव?
“या पुस्तकातील मजकूर मी चार वर्षापूर्वी लिहिला (या पुस्तकात रूपांतर अवस्था होतात हे आपणाला मान्य आहे असे ते म्हणतात. लेखक) पण मी हे पुस्तक आता लिहिले असते तर ते काही वेगळेच झाले असते असे मला वाटते. क्रमशः सुधारणा -क्रमिक सुधारणावाद या संकल्पनेवर माझा विश्वास आहे. त्याला कारण डार्विनची शिकवण हे नसून आनुवॉशिकता शास्त्राचे माझे ज्ञान हेच त्याचे कारण आहे. परंतु, सुप्रसिध्द जीवाश्म अवशेष तज्ज्ञ, स्टोफन जे. गुल्ड आणि अगोरिंकन म्युश्षियमचे तज्जञ यांना विरोध करणे वाटते तेवढे सोपे नाही. कारण रूपांतराच्या मध्यावस्था दाखवणारे जीवाश्म अवशेष नाहीतच असे ते ठामपणे म्हणतात मी स्वतः जीवाऱम तज्ज्ञ आहे. आणि उपलब्ध जीवाश््य अवशेषांच्या नोंदीतून पूर्वजांचे आकार-अवशेष कोणते ते शोधण्याची तात्विक समस्या गाझ्यापुदे आहे. तुम्ही म्हणता: “अत्येक प्रकारचा जीव ज्यापासून आला त्या त्या जीवाश््माचे छायाचित्र तरी द्यावे “ तेव्हा मी आता स्पष्टच सांगतो की ज्या विषयी ठामपणे प्रतिपादन करून स्पष्टपणे “हे असे आहे याच्यापासूनच हे” असे दाखवता येईल असा एकही जीवाश्म अवशेष नाहीच.
मग आपल्याकडे आता आहे तरी काय? उत्क्रांतीच्या मतानुसार असे मध्यावस्थेतील लक्ष लक्ष आकार-अवशेष असले पाहिजेत आणि ते तसे आहेत असे काही उत्क्रांतीवादी ठामपणे सांगतात-कदाचित असले मध्यावस्था दर्शवणारे जीवाश्मांचे मूठभर प्रकार असतील. पण इतर आघाडीचे तज्ज्ञ आहेत ते म्हणतात असा एकही अवशेष नाही.

ऑकिरऑप्टॉरेक्स या नावाचा एक विचित्र प्राणी जीवाश्म रूपात सापडतो. सरपटणारे प्राणी व पक्षी यांच्यामधील मध्यावस्था दर्शविणारे एक उदाहरण म्हणून या प्राण्याचा वारंवार उल्लेख करतात. (कारण या प्राण्यामध्ये सरपटणारे प्राणी व पक्षी या दोन्ही प्राणीवर्गाची लक्षणे आढळतात. तथापि ही मध्यावस्था आहे असे स्पष्टपणे सिद्ध होईल अशी कोणतीच रचना स्थित्यंतराची लक्षणे त्यात आढळत नाहीत. हे फारच थाड्यांना माहीत आहे. या प्राण्यांची पिसे पूर्ण विकसित झाली आहेत. त्यांचे पंख खरोखरीचे पंख आहेत. झाडावर बसणाऱ्या पक्ष्यांसारखे त्याचे पाय बाकदार आहेत. तसेच मागे वळलेली नखे आहेत. काही लोक त्याची पुर्नरचना करून हा प्राणी म्हणजे पंख असणारा, धावणारा, दिनोसॉर असे म्हणतात पण तसे मुळीच नाही.
काही जिवंत प्राण्यांमध्ये (उदा. प्लॅटिपस) वेगवेगळ्या प्राणीवर्गात आढळणाऱ्या विविध लक्षणांचा संकोर्ण समुच्च दिसून यतो प्लॅटिपस हा असाच एक छोटासा विचित्र प्राणी आहे. त्याची चोच बदकासारखी तर अंगावर सस्तन प्राण्यांसाराखी दाट लोकर बीव्हर प्राण्यांसारखी शेपूट तर सापासारखे विषपिंड आहे तो सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो. पण आपल्या पिलांना अंगावर दूध पाजतो. हे अनेक लक्षणांचे एकत्रीकरण झाल्याचे उत्तम उदाहरण आहे. तथापि ही वर दिलेल्या कोणत्याही दोन प्राण्यांच्या स्थित्यंतरातील ‘मधली अवस्था’ मात्र नाही हे निश्चित.
स्थित्यंतराची मध्यावस्था दाखवणारे आकार- अवशेष सर्वसाधारणपणे उपलब्ध होत नाहीत. म्हणजे ते तसे नाहीतच ही स्थिती तथाकथित ‘मानवी-उत्क्रांती’ लाही लागू आहे. हे आपले ‘पूर्वज’ म्हणून नानाविध नमुने, उदाहरणे दाखवली जात आहेत हे लक्षात घेता वरील मुद्दा बराचसा चकित करणाराच वाटतो. ‘पूर्वज’ म्हणून जे जे पुरावे अवशेष सादर केले त्या सर्वांचाच समाचार घेणे त्यातील विविध उलटसुलट मतप्रवाह पाहणे अवघड आहे. तरीपण गेल्या शतकात एक गोष्ट निश्चितपणे दिसून आली आहे. ती हीच की, ‘अमुक एक नमुना-माणसाचा पूर्वज’ आहे असा गाजावाजा करून मांडलेला दावा- दुसरा एखादा नमुना पुढे आला की मागे पडतो. आज अस्ट्रेलियात सापडलेल्या मानवसदृश अवशेषांचा खूपच बोलबाला आहे. हा अवशेषांचा मोठा समूह असून त्यातील लुसी हा अवशेष सर्वश्रुत आहे.

आज उत्क्रांतीवादी मानवशरीररचना शास्त्रज्ञांची संख्या वाढती आहे. डॉ. चार्लस ऑक्सनार्ड हे त्यांच्यापेकी एक आहेत. त्यांनी संगणकाच्या साहाय्याने बहुस्तरीय बदल लक्षात घेऊन अवशेषांच्या मोजमापांचे विश्लेषण केले आहे. (ही वस्तुनिष्ठ पद्धत असून यात ‘पूर्वज’ या पूर्वग्रहीत कल्पनेचा कसलाच आधार घेतलेला नाही.) जीवांचे हे अवशेष मानवाचे पूर्वज आहेत असे त्यांना मुळीच वाटत नाही.
ते म्हणतात, आरंभी असे वाटत होते की हे अवशेष मानवसदृश आहेत किंवा कमीत कमी कपि (वानर) आणि मानव यांच्यातील मध्यावस्था दाखवणारा दुवा आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. मानव आणि आफ्रिकन वानर यांच्यात जेवढा फरक, आहे त्याहून अधिक भेद या अवशेषांमध्ये आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियात सापडलेले हे अवशेष अनन्य आहेत. ऑक्सनार्ड म्हणतात की, ज्यांना मुळात हे अवशेष सापडले त्यांच्याशी कोणताच संबंध नसलेल्या संशोधकांनी केलेल्या पाहणीतून या जीव अवशेषांना पूर्वजांचा दर्जा देता येत नाही हेरू मत ठामपणे पूडे आले आहे.
होमो इरेक्टस, (दोन पायांवर सरळ उभी राहू शकणाऱ्या मानवसदृश आकृतीचे अवशेष) या विषयी काय सांगता येईल? होमो इरेक्टस प्रकाराचे जे सांगाडे मिळाले आहेत ते महाप्रलयानंतरच्या खऱ्या मानवांचे7 अवशेष असावेत व त्यांच्यात वंशानुसार अस्थिरचनेचे बदल आढळतात.
वेगवेगळ्या प्रकारच्या कुत्र्यांच्या अस्थिमध्ये प्रचंड फेरबदल आढळून येतात. चिवाव (एक अतिशय छोटा कुत्रा) आणि ग्रेट डेन या कुत्र्यांमध्ये तर हे बदल अगदी लक्षणीय आहेत. पण अशा फेरबदलांची निवड फक्त काही पिढ्यांपुरतीच असते. जलप्रलयानंतर वातावरण झपाट्याने बदलले (देवाने बाबेल येथे लोकांची पांगापांग होईल असे केले) त्यामुळे लोकांचे छोटे छोटे अलग समूह झाले त्यातून ‘निवडीचा दबाव’ वाढत राहिला परिणामी (पूर्वी असलेले, निर्माण केलेले) आनुवंशिक बदल झपाट्याने अलग होऊन त्यांची वाढ होत गेली. या वांशिक फेरबदलामध्ये अस्थिरचनेचे भेदही समाविष्ट असणारच.
मानव जातीतील इतर लक्षणांमध्ये आढळणारे व्यापक भेद लक्षात घेऊन त्यांच्याशी तुलना करता इरेक्टस सांगाडे आणि इतर मानवी सांगाडे यांच्यातील अस्थिरचना संबंधीचे भेद हे एवढे टोकाचे पराकाष्ठाचे नाहीत. आणखी मजेची गोष्ट अशी को युरोपमध्ये ‘इरेक्टस’ च नव्हे तर निऊंडर्थल आणि क्रो- मॅग्नन हे मानवसदृश जीवही आजच्या मानवाच्या बरोबरीने त्याचवेळी हयात होते. (निअँडर्थल व क्रोमॅग्नन या दोघांच्याही मेंदूची क्षमता सरासरीने आजच्या लोकांपेक्षा अधिक होती).
इंडोनेशियामध्ये स्टेगोडॉनच्या (एक पूर्वीचा दिनोसारसारखा प्राणी) अवशेषांच्या जवळ काही हत्यारांसारखी साधने आढळली त्यावरून उत्क्रांतीवादी डॉ. अँलन थार्न यांनी म्हटले आहे की या “मानवापूर्वीच्या पूर्वजांना जलपर्यटनाचे कौशल्य आणि तंत्रज्ञान अवगत होते. ते पुढे म्हणतात, ते होमो इरेक्टस नाहीत (त्यांना तसे म्हणता कामा नये). ती माणसे-लोक आहेत” (द ऑस्ट्रोलियन, ऑगस्ट १९, १९९३)
उत्क्रांतीवादी गेकांचे स्वतःचे कालप्रमाण आणि वर्गीकरणाचे निकष वापरून एखाद्या तक्त्यावर मनुष्य सदृश अवशेषांची नोंद केली तर यात काही उत्क्रांती वाद आहे, हा दावा साफ कोसळून पडतो असेच टिसेल.8
आज उत्क्रांती घडून येताना आपल्याला दिसते का ?
थोडक्यात सांगायचे तर दिसत नाही. तथापि सजीवांच्यामध्ये मात्र बदल होत असतो. याचे स्पष्टीकरण पाहा. प्रत्येक सजीवामध्ये एक कार्यक्रम असतो. म्हणजे एखादा घराचा यंत्राचा नकाशा असतो - पदार्थाची कृती असते तसा सूचनांचा एक संच असतो हे आता आपण जाणतोच. अमुक एक सजीव सुसर - मगर होणार की आंब्याचे झाड होणार हे त्या सूचनांवरून ठरते व तसे घडून येते. माणसाच्या बाबतीत बोलायचे तर एखाद्या व्यक्तीमध्ये डोळे काळे, निळे तपकिरी होतील, तिचे केस सरळ वा कुरळे असतील वगैरे सर्व या सूचनांवरून ठरते. या सर्व सूचना सजीवांच्या शरीरातील पेशीमध्ये असणाऱ्या एका लांबलचक रेणूवर नोंदवलेले असते. या रेणूला डीएनए हे नाव दिले आहे.9

एकपेशीय अमीबा या अगदी साध्या जीवापासूनच घोड्यासारखा कितीतरी गुंतागुंतीचा जीव आकारास आला आहे असे उत्क्रांती मत सांगते. तसे पाहिले तर आपणाला माहीत असलेले अगदी साधे एक पेशीय जीवसुद्धा एवढे गुंतागुंतीचे असतात की ते पाहून मन थक्क होते. अर्थात त्यांच्या डीएनएमध्ये घोड्याच्या डीएनएमध्ये आहे तेवढी माहिती नसते. हे स्पष्टच आहे. उदा. डोळे, कान, रक्त, मेंदू, .टाचा-खूर, स्नायु … वगैरे कसे तयार करावे या सूचना त्यात नसतात.

खऱ्या उत्क्रातीमध्ये डीएनए
माहितीमध्ये मोडी वाट आवशयक आहे.
(येथेही वाढ ‘पुस्तके’ या प्रतीकाने दाखवली आहे.)
पुढील आकृतीमध्ये अ) पासून ब) पर्यंत जायचे तर मध्ये अनेक टप्पे ओलांडावे लागतील. प्रत्येक टप्प्यात माहितीची वाढ होत राहील. नवीन रचना, नवी कार्ये, नवी उपयुक्त क्लिष्टताया सर्वांसाठी माहिती संकेत येत राहतील.
याप्रमाणे माहिती सूचनांमध्ये वाढ होऊन घडणारे बदलआपल्याला अगदी थोडे जरी दिसले, पाहता आले तर त्यांच्या आधारे असे ठाम प्रतिपादन करता येईल की पुरेसा वेळ दिला तर मासे बदलतील आणि त्यांचे तत्त्ववेक्ते होतील. वास्तविक पाहता आपणाला जे अनेक किरकोळ बदल दिसतात. त्यात माहितीची वाढ होत नसते-तथापि त्यांच्याच आधारे उत्क्रांती मताला पाठबळ देण्याचा प्रयत्न चुकीच्या दिशेने होत असतो. हे आपण पुढे पाहणारच आहोत.
नेसर्गिक निवड म्हणजे उत्क्रांती नाही
ही माहिती पुढे पाठवण्यासाठी म्हणजे एका अर्थी स्वतःची नक्कल (पुनरूत्पत्ती) करण्यासाठी सजीवांना कार्यान्वित केलेले असते. एखाद्या मनुष्याच्या डीएनएची नक्कल करून ती वीर्यपेशींच्याद्रारे पुढे पाठवली जाते तर स्त्रीच्या डीएनएची नक्कल अशीच तिच्या बीजांड पेशींच्याद्रारे पाठवली जाते.
या रितीने मात्याची व पित्याची माहिती उतरून घेऊन पुढच्या पिढीला दिली जाते. आमच्या प्रत्येकाच्या पेशींच्या आत ‘माहितीच्या’ दोन लांबलचक समांतर दोऱ्या असतात. त्यातील एक आईकडून तर दुसरी बाबांकडून10 आलेली असते. (गाठी बांधलेल्या एखाद्या दोरीत मॉर्स ध्वनीसंकेताच्या खुणा बसवल्या आहेत अशी कल्पना करा-हे ध्वनिसंकेत वाचतात तसे डीएनएचे संकेत पेशींच्या, गुंतागुंतीच्या यंत्रणेच्याद्रारे ‘वाचावे’ लागतात.
भाऊ आणि बहिणी अगदी सारखे दिसत नाहीत याचे कारण हेच की ही माहिती वेगवेगळ्या प्रकारे जुळवलेली असते. ही माहिती पुन्हा खालीवर करणे अगर तिची पुन्हा जुळणी करणे यामुळे सजीवांच्या कोणत्याही समूहात माणसे-वनस्पती अगर प्राणीपुष्कळच बदल आढळतात.
समजा आपल्याकडे पुष्कळशी कुत्री आहेत. ही सर्व कुत्र्यांच्या एकाच जोडीची प्रजा आहे. आता यातील काही कुत्री ठेंगणे असतील तर काही अधिक उंच असतील. तथापि बदलाच्या या सामान्य प्रक्रियेत कोणत्याही नव्या माहितीचा कसलाच संबंध नाही. सर्व माहिती त्या कुत्र्यांच्या मूळच्या जोडीमध्ये होतीच. कुत्र्यांची पैदास करणाऱ्या एखाद्या माणसाने यातील सर्वात लहान (कमी उंचीचे) कुत्रे निवडले व त्यांची प्रजा वाढवली तर यथाकाल त्याच्यातून नव्या प्रकारच्या कुत्र्यांची पैदास होईल. ही कुत्री अगदी छोटीशी असतील. पण यातही नव्या माहितीचा काही संबंध येत नाही.

त्या माणसाने त्याला हवे तेच कुत्रे निवडले व उरलेल्यांना नाकारले. त्याच्या दृष्टीने जे जास्त ‘योग्य’ आहेत त्यांनाच त्यांची जीन्स पुढे दुसऱ्या पिलांना देऊ दिली.
कुत्र्यांच्या एखाद्या जातीत उंच व ठेंगणे कुत्रे असतील तर त्यांच्यातून निवड न करता फक्त या छोट्याशा कुत्र्यांची पुढे पैदास करीत राहिले तर कितीही प्रयत्न केले, निवड केली तर त्यांच्यातून उंच कुत्रे मिळणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. कारण कुत्र्याच्या या समुहात मुळात असलेली ‘उंची’ संबंधीची काही माहिती आता हरवलेली असते.
निसर्गदेखील असाच काहींची निवड करतो व बाकीच्यांना नाकारतो. कोणत्याही एका परिसरात- परिस्थितीत काही जीव टिकून राहण्याची शक्यता अधिक असते व हेच जीव आपली माहिती पुढील पिढीला देऊ शकतात. त्या परिस्थितीत उग्लेल्या सजीवांच्या मध्ये ही क्षमता तेवढीशी प्रभावी नसते. नैसर्गिक निवडीमध्ये काही माहितीला इतरांपेक्षा झुकते माप दिलेले असते; त्यात काही माहिती नाहीशी होते, पण निसर्गाला कोणतीही नवी माहिती उत्पन्न करता येत नाही.
उत्क्रांतीच्या तत्त्वामध्ये नवी माहिती निर्माण करण्याची भूमिका बदल परिवर्तनाकडे दिली आहे. माहिती उतरून घेताना केव्हातरी योगायोगाने अपघाताने होणाऱ्या चुकांमुळे हे परिवर्तन वा बदल घडतात. अशा चुका होतात आणि त्या अनुवंशिक - वंशपरंपरेने पुढे चालतात हे आम्हांला माहीत आहेच ( कारण पुढची पिढी सदोष नकलेवरून पुढची नकल उतरून घेत असते) त्या प्रकारे हा दोष पिढ्यान पिढ्या येत राहतो. आणि मग पुढे आणखी कोणत्या तरी पिढीत आणखी एखादी चूक होते. मग बदलामुळे होणाऱ्या या दोषांची संख्या वाढत जाते. यालाच आनुवंशिकतेचे अगर पिढ्यांतील बदलाचे ओझे व त्याची समस्या असे म्हटले आहे.
मनुष्यामध्ये असे हजारो दोष पिढीजात अनुवंशिकतेतून आल्याचे माहीत आहे. या दोषामुळे होणाऱ्या अनुवंशिक रोगांवरून ते समजतात. या रोगात दात्र-कोशिका पांडुरोग (सिकल सेल अनिमिया) मांसपेशींचे अर्बूद स्नायूंच्या गाठी होणे, रक्तक्षय, फेनिल लेटोन्युरिया (लहान मुलांना होणारा एक आनुवांशिक रोग- यातून मतिमंदता संभवते) … अतिशय गुंतागुंतीच्या या गुप्त संकेत11 भाषेत अकस्मात-चुकीने काही बदल झाला तर परिणामी रोग होणे, कार्यशक्ती नाहीशी होणे असे घडते यात नवल काहीच नाही.
लाभदायक आळृती बदल ?
आकृती अथवा आकार रूपबदल हे प्रचंड प्रमाणात एकतर अपायकारक असतात अगर अनुवंशिकतेचा निरर्थक कलकलाट असतो हे उत्क्रांतीवादी मंडळीला चांगलेच माहीत आहे. परंतु त्यांच्या एकंदर श्रद्धा व्यवस्थेत प्रसंगोपात हे आकार रूप बदल उर्ध्व दिशेने होणे अगत्याचे असते. खरे पाहता एखाद्या सजीवाला एखाद्या परिसरात तग धरून राहणे सोपे व्हावे यासाठी उपयुक्त असे केवळ मूठभर-अगदीच अल्प रूप बदल झाल्याचे माहीत आहे.

डोहाच्या कपारीत राहणारे नेत्रहीन मासे तेथे चांगला तग धरून राहतात कारण त्यांना डोळ्यांचे विकार होत नाही. पंख नसलेले कोटक समुद्रातील खडकावर जोराच्या वाऱ्यातदेखील आरामात असतात कारण ते वाऱ्याने उडून जाण्याची शक्यता फारच कमी तथापि डोळे नसणे आणि पंख तयार करण्यास आवश्यक असणार्या माहितीचा लोप होणे अगर त्यात बिघाड होणे. हा कसेही पाहिले तरी दोषच आहे म्हणजेच देहयंत्रणेतील पूर्वी कार्यक्षम असणारा एक भाग विकृत होतो.12
फक्त जीवनात टिकून राहण्यासाठी असे बदल लाभदायक असले तरी यातून प्रश्न उपस्थित होतो तो हा की येथे माहितीची अधिक वरच्या दिशेने वाढ झाल्याचे कसे दिसते नव्या कार्यकृतीसाठी नवी माहिती संकेत, यंत्रणेचे नवे कार्यक्रम नवी उपयुक्त रचना वगेरे कोठे दिसते? कोटकनाशकांचा उपयोग केल्याने कालांतराने कोटकांवर त्या कोटकनाशकांचा प्रभाव कमी होतो, कोटक प्रतिरोधक शक्तीचा अवलंब करतात हे उदाहरण देणे निरर्थक आहे. कारण खरे पाहता माणसाने कीटकनाशक द्रव्यांची फवारणी सुरू करण्यापूर्वीच त्या त्या कीटकसमूहातील काही कोटकांमध्ये ही प्रतिरोध शक्ती होतीच आणि पुढे ही शकी असंणारे कीटकच टिकून राहिले, त्यांची प्रजा वाढली.13
वास्तविक पाहता, एखाद्या समूहातले प्रतिकार करू न शकणारे डास, उदाहरणार्थ डीडीटीने मारले जातात तेव्हा त्यातून टिकून उरलेल्या डासांपासून डासांची नवी पेदास हाते- त्यात बहुसंख्य (पण आता मृत) डासांच्यामध्ये असलेल्या आनुवंशिक माहितीपेकी काही माहिती उरलेल्या अल्पसंख्य डासांच्या मध्ये आलेली नसते आणि त्या डासांना पुन्हा ही माहिती कधीच मिळत नाही ती कायमचीच गेली.14
सजीवांच्यामध्ये वारशाने होणारे बदल प्रत्यक्षात घडून येताना आपण पाहतो तेव्हा दोनच गोष्टी संभवतात. एक तर मूळची माहिती आहे तशीच राहते (ती वेगवेगळ्या प्रकारे पुन्हा एकत्र केली जाते एवढेच). अगर माहिती विकृत होते किंवा हगवते (आकाररूप बदल-अस्तित्व न उरणे), पण माहितीच्या दृष्टीने, उत्क्रांतीच्या दिशेने खरोखरी उर्ध्वगामी बदल होत आहेत असे कधीच निदर्शनास येत नाही.
यावर विचार करा
आणि तुम्हांलाही हेच अपेक्षित आहे ना? माहितीचा सिद्धान्त आणि सारासार विचार बुद्धी ही दोन्ही एकमुखाने हेच सांगतात की माहिती पुढे पाठवली जाते तेव्हा (येथे हीच पुनरूत्पत्ती - प्रजनन आहे) एकतर ती आहे तेवढीच राहते. अगर गहाळ होते कमी होते. आणि त्यात निरर्थक कलकलाटाची भर पडते.15 खर्या माहितीचा आपोआप उदभव होणे अगर त्यात वाढ होणे. अशी गोष्ट सजीवात किंवा निर्जीवात कधीच आढळून येत नाही.
म्हणूनच तुम्ही जगातील सर्वच बायोटा म्हणजे सर्वच सजीवांचा सातत्याने एकत्र विचार केला तर माहितीचा एकंदर समुच्चय काळ जातो तसतसा कमी होत आहे, कारण तीचती माहिती पुन्हा पुन्हा नक्कल करुन / उतरून घेतली जाते पण गतकाळात मागे मागे जाऊ तसतशी ही माहिती वाढत गेली पाहिजे हे ओघाने आलेच. पण ही प्रक्रिया अगदी अनंतकाळ सतत मागे नेता येईल असे कोणीच म्हणत नाही. (अनंत काळापूर्वी अतिशय गुंतागुंतीची रचना असलेले सजीव राहात नव्हतेच) तेव्हा मागेमागे जाताना या गुंतागुंतीच्या जटिल माहितीचा आरंभ झाला त्या टप्प्यावर पोचणे क्रमप्राप्तच आहे.
वस्तु-पदार्थ जसेच्या तसे ठेवून दिले. (निरिक्षणाधारित वास्तव विज्ञानाला ज्ञात आहे त्यानुसार) तर त्यातून आपोआप अशा माहितीचा उदय होत नाही. त्तेव्हा याला एकच पर्याय उरतो. तो हाच की कोणत्या तरी एका क्षणी या एकंदर यंत्रणेच्या बाहेर असलेल्या सर्जनशील मनाने पदार्थांना बुद्धी दिली (आपण अक्षरे जुळवून वाक्य लिहितो तेव्हा असेच करतो) आणि मुळारंभीच्या सर्व वनस्पती आणि प्राणी यांना कार्यान्वित केले. आजच्या सजीवांच्या (वनस्पती-प्राणी इ. सर्व जीवधारी) पूर्वजांना असे माहिती देऊन कार्यान्वित करण्याची कृती अदभुत, अलोकिक प्रकारेचे झाली असलीच पाहिजे; कारण निसर्ग नियमांना माहिती निर्माण करण्याची क्षमता नाही.
आपआपल्या जाती प्रकारानुसार पुनरूत्पत्ती करण्यासाठी देवाने सजीवांची निर्मिती केली. या उत्पत्तीच्या पुस्तकामधील विधानाशी वरील प्रतिपादन अगदी सुसंगत आहे. उदाहरणार्थ कुत्र्याच्या जातीचा सजीव निर्माण केला. त्याच्या अंतर्रचनेत फेरबदलांची भरपूर माहिती मुळातच ठेवली-त्यात मूळची काहीही उणीव नव्हती. असे म्हटले तर या मूळच्या माहितीची पुन्हा पुन्हा जुळणी केल्याने त्यांच्यातून लांडगे, कोयेटि, डिंगो वगैरे श्वान कुलातले प्राणी उपजले.

नैसर्गिक निवडीमध्ये ही माहिती एकत्र करणे, तिची विल्हेवाट लावणे (पण यात नवी निर्मिती होत नाही) हे साधण्यासारखे आहे असे आपण डासांच्या उदाहरणात पाहिले. यातून उपजणारी प्रजा पाहिली तर ही वेगळीच जात आहे असे म्हणण्याएवढी त्यांची संख्या मोठी असते. पण त्यांच्यात नव्या माहितीची *काही भर पडलेली नसते (म्हणूनच ही उत्क्रांती नाही) संकरित कुत्र्यांची प्रजासंख्या त्यांचे उपवर्ग करून कुत्रिम निवड पद्धतीने (पाळीव घरगुती पैदास) कमी करता येते.
हे उदाहरण पाहण्याजोगे आहे. यातील प्रत्येक उपवर्गात मूळच्या माहिती साठ्यातील एक अंश तेवढाच असतो. याच कारणाने चिवाव या कुत्र्यांच्या अगदी छोट्या जातीपासून आपणाला ग्रेट डेन अगर अल्सेशियन सारख्या भल्या थोरल्या कुत्र्याची पैदास कधीच करता येणार नाही. कारण कुत्र्यांच्या या समूहात आवश्यक ती माहिती आता उपलब्ध नाही.
त्याचप्रमाणे ‘मूळचा हत्ती’ हा प्रकारही असाच विभागला गेला. त्याच्या निर्मित माहितीच्या आधारे नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाने व त्याचे आफ्रिकन हत्ती, भारतीय हत्ती, मॅमथ आणि मस्टडून (हे शेवटचे आता अस्तित्वात नाहीत) असे उपप्रकार झाले.

यात एक गोष्ट लक्षात येईल की त्या त्या जाती प्रकारात मूळची जी माहिती असेल तिच्या मर्यादेतच असे हे बदल घडू शकतात. या प्रकारचे फेरबदल / उपप्रकार-पोट जाती झाल्याने पुढे यथावकाश एखाद्या आमीबाचे रूपांतर आंब्याच्या झाडात होत नाहीकारण मूळ माहितीचे क्रमण उर्ध्व दिशेने होत नाही. मूळ माहितीत कसलीच नवी भर पडत नाही. जीनचा साठा या प्रकाराला कमी-विरळ होत जाण्याला काही जण ‘उत्क्रांती’ म्हणत असतात. तथापि उत्क्रांती या संज्ञेने नेहमी सूचित होणारा अर्थ- म्हणजे माहितीत भर पडून साध्या जीवापासून गुंतागुंतीचे प्रगत जीव निर्माण होणे- हा अर्थ त्यातून व्यक्त होत नाही.16
सजीवांच्यामध्ये आढळणाऱ्या सारखेपणाविषयी काय म्हणावे?
त्याच एका रचनाकाराच्या हाताने समान हेतू उद्देशाच्या रचनेसाठी समान आराखडा असावा अशीच कोणीही अपेक्षा करील.

अणू रेणूंच्या सारखेपणाविषयीही तसेच म्हणता येईल. एखाद्या मोठ्या बेडकापेक्षा चिपांझी अधिक करून आमच्यासारखा आहे - आणि हा सारखेपणा त्याच्या अंतर्गत जुळणीमध्येही उदा. प्रथिनांच्या रचनेतही दिसून आला पाहिजे.17
पुढच्या पायाच्या अस्थिरचना दाखवणाऱ्या या आकृतीतील सारखेपणाचा खुलासा (याला रचना सादृश्य म्हणतात) दोन प्रकारे करता येईल. एकतर या सर्वांचा पूर्वज एकच होता. किंवा एकच रचनाकार होता. परंतु त्यांचे आस्तित्व हे यातील कोणत्याही खुलाशाचे प्रमाण पुरावा आहे, असे मात्र म्हणता येत नाही.
उत्क्रांतीमताच्या लोकांच्यापुढे या संदर्भात काही अवघड समस्या उभ्या राहतात. कारण अनेक प्राण्यांच्यामध्ये अशी समान रचना भ्रूणाच्या (गर्भ) अगदी वेगवेगळ्या भागातून होतात. असमान जीनपासून होतात आणि भ्रूणाच्या वेगवेगळ्या अंशातून होतात. एकंदर प्रतिपादनात हे मोठेच अडथळे आहेत.18
येथे ज्या प्राण्यांची पुढील पायांची अस्थिरचना दाखवली आहे त्यांच्या मागील पायांमध्येही तीच मूलभूत अस्थिरता आढळते. सुसंगत प्रतिपादन करायचे तर या सारखेपणाचा खुलासा असाच करावा लागेलकी हे सर्व हात वा पाय यांची एकच जोडी असलेल्या प्राण्यांपासून उत्क्रांत झाले आहेत आणि पुढचे हात मागचे पाय यांची मूळ पूर्वज रचना म्हणजेच ही एक जोडी समान होती.
बहुतेक सर्वच उत्क्रांतीवादी लोक म्हणतील हे सर्व निरर्थक अर्थहीन आहे आणि पुढचे अवयव/हात व मागचे अवयव/पाय यात एकच रचना उत्क्रांती विकसीत झाली आहे. कारण या रचनेचे काही जैव - यांत्रिकी फायदे आहेत. पण वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्राण्यांच्या अवयवांच्या संबंधात ‘रचनाकाराची मर्जी’ हेच याचे संयुक्तिक कारण होत नाही का?
रेणवीय जीववैज्ञानिक (मोलिक्युलर बॉयॉलॉजिस्ट) माकल डेंटन (सृष्टी ईध्वरनिर्मित आहे हे मत यांना मान्य नाही) ह्यांनी असे दाखवले आहे की वेगवेगळ्या जातीच्या सजीवांच्या प्रार्थनांची जीव - रसायन शास्त्राच्या आधारे तुलना केली तर त्यातून सर्वत्र मानले जाते तसे उत्क्रांती तत्त्वाला काही पाठिंबा मिळत नाही, परंतु सजीवांच्या विविध प्रकारचे जातींचे अस्तित्वात आहे हेच वास्तया म्हणण्याला काहीच आधार मिळत नाही. सृष्टीची दिव्य निर्मिती का उत्क्रांती या सर्वच विषयांचा सखोल विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने त्यांचे इव्होल्यूएशन ए थिअरी एन क्रायसिस हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
उत्क्रांती होताना उरळेळे अवशेष

तथापि, सुप्रसिध्द जर्मन उत्क्रांतीवादी अर्न्स्ट हॅकेल यांनी काढलेल्या या रेखा आकृतीमध्ये दाखवले आहे तेवढे हे गर्भ सारखे नसतात. या सर्वच आकृती नकली, खोट्या आहेत असे अलीकडेच एका इंग्लिश वैद्यकीय तज्ज्ञाने सर्व जगभर उघड केले आहे. (पहा क्रीएशन मॅगझिन, खंड २०, क्र. २ पृ. ४९-५१, १९९८)
“अवशिष्ट अवयव” हा मुद्दा घेऊन आता कोणीच आपल्या मताचे समर्थन करीत नाही. कारण एकतर हे समर्थन लंगडे आहे आणि त्यामुळे गतकाळात वादविवादात अनेकदा अवघड परिस्थिती आली होती.
विसाव्या शतकाच्या आरंभी उत्क्रांतीवादी लोक अगदी ठामपणे सांगत की, आपल्या शरीरांमध्ये ८० पेक्षा अधिक निरूपयोगी अवयव आहेत. आणि ते सर्वच्या सर्व आमच्या भूतकालीन उत्क्रांती क्रम विकासाचे अवशेष आहेत. परंतु पुढे एकामागून एक या क्रमाने या प्रत्येक अवयवांचे कार्य काय ते उघड झाळे आणि आता असा कोणताच अवयव ‘निरूपयोगी’ उरला नाही.
मानवाच्या पोटातील मोठ्या आतड्याच्या टोकाला असलेल्या अगदीच सामान्य भागाचाही आंत्र पुच्छ/अपेंडिक्स रोगजंतूचा प्रतिकार करण्यात मोलाचा वाटा असतो. त्याचे हे कार्य माणसाच्या किशोर वयापर्यंत होते.19
तसेच मानवी गर्भाच्या विकासात त्याला पूर्वीच्या आणि प्राणी अवस्थेच्या टप्प्यातून जसे गिल वगैरे जावे लागते या मताचाही केव्हाच खरपूस समाचार घेऊन ते निरर्थक असल्याचे कितीतरी काळापूर्वी दाखवले तरी त्यात अद्याप धुगधुगी आहेच.20
मानवी इतिहास
आधुनिक काळात मानवी लोकसंख्येची प्रतिवर्षी १ % पेक्षा अधिक या प्रमाणात सातत्याने वाढ होते आहे. रोगराई, दुष्काळ, लढाया वगैरे बाबी लक्षात घेऊन आपण ही वाढ प्रतिवर्षी फक्त अर्धा टकक््काहोते असे ठोकळमनाने समजू. वाढीचा दर घेतला तर महाप्रलयांनतर, आरारात येथे आठ व्यक्तींपासून प्रजननाचा आरंभ होऊन आजच्या एवढी लोकसंख्या होण्यास फक्त ४००० ते ५००० वर्षेच लागतील.
डार्विनने आपला ऑरिजिन आफ स्पीशीजू सजीव जातींची उत्पत्ती हा ग्रंथ प्रसिध्द केला त्यानंतर वंशभेदाच्या भावना भडकल्या हे अनेक लेखांतून दाखवले आहे. कारण मानवाचे विविध वंश वेगवेगळे असे लाखो हजारो वर्षे उत्क्रांत होत होते असे उत्क्रांतीवादी लोकांचे ठाम मत होते. आणि यावरून ही प्रगती उत्क्रांती विकास वेगवेगळ्या स्थळी कमी अधिक वेगाने होत होता. म्हणूनच काही मानववंश अद्याप त्यांच्या पशू पूर्वजांच्या अगदी जवळ होते तर काही त्यांच्यापासून फार दूर गेले होते - म्हणजेच त्यांचा चांगला विकास झाला होता असे म्हणणे अगदी तर्काला धरूनच होते.
पण आधुनिक आनुवंशिकता शास्त्राने स्पष्टपणे दाखवले हे की सर्वच मानववंश जीवशास्त्रदृष्ट्या परस्परांच्या अगदी निकट आहेत, बाबेल येथे जो एक लहानसा (तुलनेने) पूर्वज लोकसमूह होता तो पांगापांग होऊन सर्वत्र विखुरला गेला त्यावेळी त्यांच्यामध्ये असणारी सर्व वंशिक लक्षणे आजच्या मनुष्यांमध्येही तशीच आहेत.21

संपूर्ण मानवजातीमध्ये एकच एक प्रमुख रंगद्रव्य आहे. हे समजल्यावर अनेकांना आश्चर्य वाटते. तुमच्या त्वचेचा रंग कितपत काळा, गोरा /पांढरा अगर तपकिरी व्हायचा हे तुमच्या अंगात असलेल्या ‘मेलानिन’ नावाच्या रंगद्रव्यावरून ठरते. मानव समुहामध्ये निर्माण केलेली सर्वच्या सर्व गुणलक्षणे नोहा व त्याचे कुटुंब - मुले वगैरे मध्ये होती, (आणि त्यापूर्वी ती आदाम व हव्वा यांच्यामध्ये होती) त्यावरून आपणाला म्हणता येते की हे सर्वजण साधारण रंगाने गहू वर्णी असून त्यांचे केस काळे व डोळे तपकिरी होते.
आणखी एक मुद्दा म्हणजे काईनच्या पत्नीचा प्रश्न. ती त्याची जवळची नातेवाईक होतीच. (उत्पत्ती ५:४ प्रमाणे आदाम आणि हव्वा यांना मुलीही झाल्या होत्या) पण या समस्येने उत्पत्तीच्या पुस्तकातील सत्याचे खंडन होत नाही तर मंडनच होते. प्रत्यक्षात हे सत्य अधिक बळकट होते. आनुवंशिक विकृतीने येणारे दोष दोषरहित आरंभानंतरच येतात व ते एकवटण्यास कित्येक पिढ्या जाव्या लागतात म्हणूनच जवळच्या नातेवाईकांशी विवाह केल्याने सदोष व्यंग संतती निपजण्याची धास्ती धरण्याचे आदामाच्या मुलांना कित्येक शतके तरी काहीच कारण नव्हते. अब्राहामानेही आपल्या सावत्र बहिणीशी बिनधास्तपणे विवाह केला आणि अगदी जवळच्या नातेवाईकांशी विवाहसंबंध करू नये, आगमननिषेधाचा नियम पुढे शेकडो वर्षांनी मोशेच्या काळात दिला होता.22
नोहाच्या काळात झालेल्या जलप्रलयाच्या महासंकटातून जगूनवाचून उरलेल्या लोकांच्या वंशजापासून वेगवेगळे मानववंश झाले आहेत. तर अशा भयानक घटनेच्या स्मृती कथा आणि दंतकथा यांच्यामधून सर्वत्र जागत्या राहिल्या असतील अशी अपेक्षा करण्याचा तर्क संगत नाही का? खरे तर ऑस्ट्रेलियातील आदिवासी, उत्तरधुवीय प्रदेशातील एक्सिमो आणि अमेरिकेतील रेड इंडियन - आदिवासी कोणीही असो - जगातल्या प्रत्येक वंशात आणि राष्ट्रात अशी जलप्रलयाची कथा प्रचलित आहेच.
या कथा सांगितल्याने काळाच्या ओघात विपर्यस्त झाल्या असल्या तरी त्यातून उत्पत्तीच्या पुस्तकातील वृत्तांताशी असलेले लक्षणीय साम्य दिसून येते. त्यात अनेकदा पक्षी बाहेर पाठवणे आणि महापुरानंतरची यज्ञार्पण यांचेही उल्लेख आढळतात. कोठे कोठे तर मेघधनुष्य आणि प्रलयातून उरलेल्या लोकांची नक्की संख्या - आठ लोक यांचाही उछ्लेख आढळतो.
caption for Chinese character diagram:

बाबेल येथे बहुभाषा होऊन लोकांची पांगापांग झाली त्यासारखे वृत्तांतही अनेक समाज समुहांच्या कथांमध्ये आहेत. परंतु उदाहरणार्थ त्यात मोशेचे तांबडा समुद्र पार करून जाणे हा वृत्तांत नाही कारण बाबेल येथे लोकांची पांगापांग झाल्यानंतर ही घटना घडली. जलप्रलय, बाबेल येथील भाषेचा छोटासा व पांगापांग हे वृत्तांत मिशनरींच्याकडून सर्वत्र पसरलेले नाहीत.

जलप्रलयाचा वृत्तांत सांगणारी मेसोपटेमिया येथील एक इष्टिका लेख. यात उत्पत्तीच्या पुस्तकातील वृत्तांताशी खूपच साम्य आढळते. पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे असे जे मान्य करीत नाहीत, त्यांचे म्हणणजे आहे की हिब्रू लोकांनी जलप्रलयाचा हा वृत्तांत आजूबाजूच्या लोकसंस्कृतीमधून घेतला. तथापि उत्पत्तीच्या पुस्तकातील नोहाचा वृत्तांत सत्य असेल तर भोवतालच्या संस्कृतीमध्ये त्याचे प्रमाण पुरावे असेच मिळणार आणि हेच योग्य आहे. मध्य पूर्वेच्याजवळ (भौगोलिक व काल या दोन्ही दृष्टींनी) असणाऱ्या लोकसंस्कृतीमध्ये जलप्रलयाच्या आठवणी अगदी सुस्पष्टच असणार. पण त्याहून दूरच्या लोकसंस्कृतीमध्ये मात्र काही फेरफार असणारव. उदा. आस्ट्रेलिया आणि अमेरिका येथील अदिवासींच्यामध्ये प्रचलित असणाऱया महापुराच्या कथा.
किरणोत्सर्गाने कालनिश्चविती (रेडिओमेट्रिक डटिंग) केल्याने पृथ्वी खूपच जुनी आहे हे सिध्द होत नाही काय?
खरे पाहता कालनिश्चिती करण्याच्या अनेक पध्दती आहेत त्यात पृथ्वीच्या आणि विश्वाच्या वयाची मर्यादा उत्क्रांतीवादाला आवश्यक त्यापेक्षा कितीतरी अधिक निश्चित केली जाते. काही पध्दतीत तर हे वय जास्तीत जास्त काही हजार वर्षे आहे. त्यापेक्षा अधिक काही नाही असे म्हटले आहे. तेव्हा उत्क्रांतीवादी मताचे पुरस्कर्ते स्वाभाविकपणे, आपोआप, अगदी नकळतपणे रूपांतर बदल सिध्दान्ताला पोषक एवढीच कालनिश्चिती करणाऱ्या (उदा. किरणोत्सर्गाने कालनिश्चिती करणाऱ्या बहुतेक पध्दती) पध्दतीच ग्राह्य मानतात.


केप लीडविन, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथील एक पाणचक्की. ६५ वर्षांपेक्षा कमी काळात ही पाणचक्की पूर्णपणे खडकात चिणली गेली.
(क्रिएशन मॅगझिन, व्हा. १६, नं. २मार्च - मे १९९४पृ. २५ वरील लेखातून फोटो - बेव्ह लुंट)
कार्बनच्या साहाय्याने लक्षावधी वर्षांची गणना करून कालनिश्चिती करता येते असा लोकांचा समज आहे, पण त्यात काहीच तथ्य नाही. (आज उपलब्ध असलेली सर्वोत्तम प्रगत विश्लेषण साधनसामग्री वापरूनही यातील जास्तीत जास्त कायलमर्यादा (आरंभीची) सुमारे १,००,००० अंदाज वर्षे एवढीच आहे.) ज्या अवशेषांमध्ये सेंद्रियकोळशाचे शेष अद्याप आहेत (ऑर्गनिक कार्बन) त्याच वस्तूंचा काल या पद्धतीने ठरवात येते. उदाहरणार्थ बहुतेक जीवाश्म यात येत नाहीत. ही पध्दत व त्यातील सर्व गृहीतके (असम्पशन्स) नीट समजावून घेतली व ती वास्तव जगातील उपलब्ध माहितीशी ताडून पाहिली तर त्यातून या जगाचे वयोमान वाटते तेवढे अधिक नाही, तुलनेने हे जग अद्याप तरूण अवस्थेत आहे. या म्हणण्याला पुष्टी मिळते. (पाहा : द आनसर्स बुक)
कालनिश्चिती करण्याच्या किरणोत्सर्गी पध्दतींचे या बाबतीत सर्वसाधारणपणे एकमत आहे. हा आणखी एक लोकप्रिय गैरसमज आहे. बहुधा आपण नकळतपणे “निवड करीत असतो. त्यातूनच हा समज उद्भवला असावा. उत्क्रांतीबादी, प्राध्यापक रिचर्ड मॉगर ह्यांनी म्हटलेच आहे : “सर्वसाधारणपणे आपल्या मतांना पुष्टी देणाऱ्या कालनिश्चिती तेवढ्याच बरोबर आहेत असे मानले जाते, व त्याच कालांना प्रसिध्दी दिली जाते आणि इतर उपलब्ध माहितीला दुजोरा न देणारे जे कालखंड असतात त्यांची माहिती लोकांपुढे कधीच येत नाही. अगर त्यातील उणीवा - दोष यांचे स्पष्टीकरण कधीच होत नाही.”
न्यूझीलंड, ऑकलंड जवळच्या रांगीटोटो या बेटावरील ज्यालामुखीचा स्फोट होऊन पसरलेल्या लाव्हारसाखाली गाडलेल्या लाकडाचा कालनिर्णय कार्बन पध्दतीने केला त्यावरून हा स्फोट
साधारणपणे २०० वर्षांपूर्वी घडला. (रांगीटोटो म्हणजे लाल आकाश या ठिकाणी माओरी ही अदिवासी जमात १००० वर्ष तरी राहत आहेत त्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली असे या नावावरून सूचित होते.) पोटॅशियम - अँरगॉन पध्दतीने कालनिश्चिती केली तर या लाव्हाचे वय पाच लक्ष वर्षे असावे असा अंदाज केला आहे ! ( क्रीएशन मॅगझिन खंड १३, क्र. १, १९९१, पृ. १५). जीवाश्मांबरोबर आढळणाऱ्या लाव्हा प्रवाहांच्या आधारे कालनिश्चिती करण्यासाठी याच पध्दतीचा उपयोग करतात हेही जाता जाता लक्षात घ्यावे.
डायनोसारविषयी थोडेसे
अनेक लोक संस्कृतीमध्ये डॅगन विषयींच्या मिथकथा, दंतकथा आहेत. ड्ॅगनहा प्राणी मोठ्या मगरीसारखा असून त्याला शिंगे असतात. अंगावर जाड खवल्यांचे कवच असते. काहींना पंखही असतात. त्यांच्या मुखातून धूर व अभ्निज्वाला बाहेर पडतात अशी त्यांची वर्णने केली आहेत. डायनोसॉर आणि इतर लुप्त झालेल्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सापडलेल्या अवशेषांवरून त्यांच्या आकाररचनेची कल्पना केली आहे. ड्रॅगनची वर्णने या प्राण्यांशी मिळती जुळती आहेत. तथापि डायनोसॉर अगर ड्रॅगन हा प्राणी प्रत्यक्षात कोणीच पाहिलेला नाही असे सांगतात. पण पवित्र शास्त्रामध्ये खरोखर ड्रॅगनचा उल्लेख आहे. (ड्रॅगन या अर्थी ॥॥॥ (तन्निन) हा हिब्रू शब्द आहे. डायनोसॉर हा शब्द एकोणीसाव्या शतकात प्रचारात आणला त्यापूर्वी हा शब्द कोणालाच माहीत नव्हता.)
पवित्र शास्त्रातील इतिहास आहे तसा स्वीकारला तर गतकाळात मानव आणि डायनोसॉर एकत्र राहत होते, अशी कल्पना
करणे मुळीच अवघड नाही. पूर्वीचे अनेक प्राणी आज लुप्त झाले आहेत.

आणि आताही घडतेच आहे. एखादी प्राणी जात लुप्त-नाहीशी होणे म्हणजे उत्क्रांती नव्हे - आणि जे डायनोसॉर नव्हते, अशा प्राण्यांपासून डायनोसॉर आले असे म्हणण्यास जीवाश्म अवशेषांचा कोणताच पुरावा नाही.23
जीवसृष्टी अपघाताने आली का ?
क्रमविकासाने जीवसृष्टीची उत्क्रांती होणे या कार्याचा आरंभ होण्यामध्ये ज्या प्रचंड मोठ्या अडचणी, दुरस्तर, असंभ्याव्य गोष्टी आहेत, त्या लक्षात घ्या. उत्क्रांतीचा आरंभ प्रत्यक्ष पाहिलेली वबस्थुस्थिती आहे असे समजून लोक त्याविषयी बोलतात, चर्चा करतात. परंतु बाह्य बुध्दिचातुर्याच्या प्रेरणा साहाय्यावाचून अगदी साध्यात साधे
पहिले जीवन आद्य जीव कसा आला त्यासाठी आवश्यक ती माहिती देणारे रेणू कोठून कसे आले ही सर्व गुंतागुंतीची प्रक्रिया कशी सुरू झाली या विषयीचे कसलेच वैज्ञानिक स्पष्टीकरण कोणालाच देता येत नाही आणि याप्रकारे आपोआप उत्क्रांतीचा आरंभ होणे केवळ अशक्यच हे मान्य करण्यास सबळ, वैज्ञानिक कारणे मात्र आहेत.
एखादी पेशी ज्या लक्षणांमुळे जीवनयुक्त होत असते त्यांचे त्या पेशीच्या रचनेतील घटकांचे रासायनिक गुणधर्म सांगितले म्हणजे पेशींच्या जीवनाचे सूत्र सांगितले असे होत नाही. रबर, लोखंड, प्लॅस्टिक वगैरेंचे गुणधर्म विशद केल्याने एखाद्या मोटारकारची गुणलक्षणे विशद होत नाहीत तसेच हे आहे. मुळात कच्च्या मालावर मोटारगाडी ही संकल्पना बाहेरून ठसवावी लागते. मोटार गाडी करण्यासाठी वस्तु/उर्जा अधिक माहिती यांची गरज असते. ‘माहिती’ ला जड वस्तूंचे गुणधर्म नसतात. ती वस्तूमध्ये नसते. पण तिचा प्रभाव मात्र वस्तूवर - पदार्थांवर पडतो.24
हा आरंभ होण्यास फक्त योग्य त्या घटकांची आवश्यकता होती तर मग सार्डिन माशांच्या हवाबंद डब्यातून कधीतरी एखादा सार्डिन मासा पुन्हा जिवंत होऊन उठत का नाही? त्याला उर्जा पुरवली तर
कदाचित ते घडून येईल काय? मुळीच नाही. जीव निर्माण होण्यास उर्जा अधिक योग्य ते घटक यांच्याखेरीज आणखी खूप काही आवश्यक असते. त्यासाठी क्रम व्यवस्था, संघटना - थोडक्यात माहिती आवश्यक आहे. सजीवांना त्यांच्या मातापित्याकडून ही माहिती मिळते. पण कच्च्या कार्यान्वित न केलेल्या जड वस्तू पदार्थांपासून माहिती येते असे कधीच कोणाला आढळून येत नाही.
सर्व जीवनाचे - सजीवांचे लक्षण अशी स्वतःला पुन्हा पुन्हा उत्पन्न करणारी (पुनरूत्पत्ती) कार्यान्वित केलेली यंत्रणा नसेल तर उत्क्रांती मतानुसार असलेल्या निवडीच्या यंत्रणांचा उपयोग त्या मताच्या प्रतिपादनासाठी कितपत व कसा होणार हे तर्काला अनुसरून सांगणे फारच कठीण आहे. सर्वच जीवन, माहिती वाहणाऱ्या अ स्तरीय रासायनिक संयुगावर अवलंबून असते. ही संयुगे म्हणजे रेणूंच लांबलचक साखळ्या असून त्याचे उपघटक ज्या क्रमाने एकत्र जोडले आहेत त्याला अनुसरून त्यांचे कार्य चालते. संगणकाला ज्या क्रमाने आज्ञा दिल्या असतील त्यानुसार संगणकप्रणाली कार्यान्वित होते, तसेच हे आहे.
म्हणजेच ही माहिती निव्वळ योगायोगाने उपस्थित झाली असे उत्क्रांतीवादी लोकांना मान्य करणे भागच आहे. हाच याचा अर्थ होतो. सृष्टी ईश्वरनिर्मित आहे हे मत मान्य नसणारे शास्त्रज्ञ सर फ्रेंड हायल ह्यांनी आपल्या इव्हेल्यूशन फ्रॉम स्पेसया पुस्तकात असे म्हटले आहे : “अनेक पॉलिमरच्या (रासायनिक संयुग) कोणत्याही एका

मिश्रणातून असा एक पॉलिमर योगायोगाने पुढे येण्याची शक्यता किती असेल ते समजण्यासाठी असे करा. संपूर्ण सूर्यमालेच्या अवकाशात अंध व्यक्तींना खांद्याला खांदा भिडवून उभे करा. सर्वांना रूबिक क्यूब द्या. आणि त्या सर्वांनी रूबिक क्यूब कसाही उलट सुलट फिरवून सर्वांना तो एकदम एकावेळी पूर्वस्थितीला आणणे जेवढे शक्य आहे तेवढेच एक पॉलिमर पुढे येणे शक्य आहे !
मग एवढे लोक बहुसंख्येने उत्क्रांतीमतावर ठामपणे विश्वास ठेवतात त्याचे कारण काय?
अर्थात याची अनेक कारणे आहेत: सामाजिक/सांस्कृतिक दडपणे याचे पर्याय कोणते ते समजण्या, पाहण्याची संधी न मिळणे बिशिष्ट प्रकारे विद्याभ्यास करणे… पण याहून दुसरे गाढ कारण आहे त्याचाही विचार करावा, असे पवित्र शास्त्र सांगते. मानवजातीच्या पहिल्या प्रतिनिधी आदाम ह्याने बंडखोरी केली तेव्हापासून आपल्या जीवनावर निर्माणकर्त्याच्या नियंत्रणाला सतत विरोध करणे हीच माणसाची अंगभूत प्रवृत्ती झाली आहे हे त्याचे मूळ कारण आहे.
रोमकरांस पत्र १:१८-२२ मध्ये असे आहे :
“वास्तविक पाहता जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवितात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते. कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदा्थवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत. अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. देवाला ओळखूनसुध्दा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत. पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुध्द मन अंधकाराने भरून गेले. स्वत:ला शहाणे म्हणता म्हणता ते मुर्ख बनले.”
निवड आपली आपली
तुम्ही एकतर असाच उत्क्रांतीवर विश्वास ठेवीत राहा अगर देवाने सृष्टी निर्माण केली यावर विश्वास ठेवणे निवडून घ्या. दिव्य सृष्टीनिर्मिती यावर विश्वास ठेवणे विज्ञानाच्या दृष्टीने योग्य आहे एवढेच नव्हे तर ते सारासार बुध्दीला पटणारेही आहे. थोडा वेळ विचार करा. या अतिशय जटिल, गुंतागुंतीच्या परस्परांवलंबी जगाकडे पहा. मानवी मेंदूची आश्चर्यकारक अदभुते रचनेचा विचार करा आणि हे सर्व अखेर आपोआप, निव्वळ योगायोगाने आकारास आले या मताचा विचार करा. असा विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रध्दाच नव्हे काय? त्यापेक्षा सृष्टीची दिव्य निर्मिती झाली हा विश्वास सर्वस्वी बुध्दीला पटणारा आहे.

सृष्टीची निर्मिती सहेतुक आहे, महाबुध्दी चातुर्याच्या समजून उमजून केलेल्या कृतीमधून झाली आहे असे असेल तर या विश्वाचा हेतू काय हे कोणी प्रकट करून सांगितले तरच आम्हांला समजणार आणि ते तसे प्रकट केलेले आहे. पवित्र शास्त्र अतुलनीय, अनन्य आहे आणि खुद्द निर्माणकर्त्याने आम्हांला सृष्टीच्या उत्पत्तीचा उद्देश त्यातून प्रकट केला आहे. असे तेथे ३००० पेक्षा अधिक वेळा ठामपणे सांगितले आहे.
देवाने निर्माण केलेल्या या जगामध्ये मरण आणि वेदना - क्लेश, दुःख आहेत हे पाहून तुम्हांला चिंता वाटते का? पण अशा या गोष्टी का आहेत हे आम्हांला समजते आणि या गोष्टी या सृष्टीच्या कायमचा भाग अशा नाहीत हेही लक्षात येते कारण उत्पत्तीचे पुस्तक सत्य आहे. 25 निसर्गाचे स्वरूप अक्राळ - विक्राळ दिसते याचे कारण (आदामाने देवाच्या आज्ञा मोडल्या म्हणून) ही सृष्टी उद्ध्वस्त, शापित आहे. पण त्यातही या सृष्टीच्या मूळच्या सौंदर्याचे व संपूर्ण उत्तमपणाचे अवशेष ठायी ठायी दिसून येतात.
तुम्ही एखाद्या विशिष्ट गटात अगर ख्रिस्ती संप्रदायात मंडळीत सामील व्हावे, अशी ही पुस्तिका प्रसिध्द करणाऱ्यांची इच्छा नाहीच. येशू ख्रिस्ताने हे जग त्याच्या उद्दिष्टांसाठी निर्माण केले आहे. त्या विषयीचा सर्व पुरावा हीच त्यांची इच्छा आहे (कलस्सै. १:१६). तुमच्या निर्माणकर्त्याबरोबर जो पापरहित देवपुत्र देहधारी झाला, ज्याने दुःख सहन केले जो मरण पावला, आणि मेलेल्यांतून पुन्हा उठला त्याच्याबरोबर तुमचा समेट व्हावा हीच त्यांची इच्छा आहे.
पवित्र देवपित्याने लावून दिलेल्या सर्वच्या सर्व नियम तुम्ही मोडले, आणि त्याच्याविरूध्द पाप केले. तुम्ही पश्चात्ताप करून देवाकडे वळावे यासाठी त्याने आमच्या पापांची शिक्षा सोसली, दंड भरला. तुमच्या वतीने त्याने केलेल्या त्या रक्त अर्पणाच्या आधारे तुम्ही स्वतःला त्याच्या अपार दयेवर आणि कृपेवर सोपवून द्यावे; म्हणजे मग तुम्हांला आता तर अधिक विपुल जीवन प्राप्त होईल एवढेच नव्हे तर सर्वकालची शिक्षा होण्याऐवजी तुम्हांला त्याच्यासह सर्वकालचे जीवन मिळेल (योहान ३:१८).
तुम्ही आत्ताच, या क्षणाला पवित्र शास्त्र का वाचीत नाही? पवित्र शास्त्र वाचण्याची सुरूवात या प्रकारे करावी - तेच इष्ट आहे. जगाचा खरा इतिहास समजण्यासाठी उत्पत्तीच्या पुस्तकाचे पहिले अकरा अध्याय प्रथम वाचा. मग निर्गम अ. २०:१-१७ मधून देवाचे नियम समजून घ्या. त्यानंतर योहानकृत शुभवर्तमान वाचा. तुमच्या परिसरातील एखाद्या नामांकित, पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती मंडळातील पुढाऱ्यांबरोबर या संबंधित विचारविनिमय करा असे आमचे सांगणे आहे.
तुम्ही खिस्ती असाल तर सृष्टीची दिव्य निर्मिती आणि उत्क्रांतीवाद यांमधील या महत्वाच्या आध्यात्मिक संघर्षाच्या मागे असणारे वास्तव, तुम्ही नीटपणे लक्षात घ्यावे हेच आम्ही तुम्हांला अग्रहाने सांगतो. “आम्हांला कोणीच निर्माण केलेले नाही तेव्हा मनाला येईल तसे वागण्यास आम्हांला काहीच अडचण नाही.” हे तत्व समाज बहुसंख्येने मान्य करीत आहे आणि आमच्या भोवताली पाहावे तर उत्क्रांतीमताचा स्वीकार होतो आहे आणि त्यातून येणारी कटू फळे आपल्या वाट्याला येत आहेत, अशा परिस्थितीत हा विचार करणे निकडीचे आहे.
ख्रिस्ती धर्माच्या सुसंगत, तर्कशुध्द पायावर आज पूर्वी कधी नव्हता असा आघात होतो आहे. तथापि, आपल्या विश्वासाचे यथार्थ समर्थन करण्यासाठी आणि आमचा प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्याकडे इतरांना वळवण्यासाठी आज अंनेक उत्तम, सबल उत्तरे उपलब्ध आहेत. आपण त्यांचा योग्य उपयोग केलाच पाहिजे.
References and notes
- जेम्स बार, रेजियस प्रोफेसर ऑफ हिब्रू, ऑक्सफर्ड, उत्पत्तीचे पुस्तक शब्दशः खरे आहे यावर त्यांचा विश्वास नाही. “सिक्स डेज: अनेस्टली’’ ही हस्तपत्रिका पाहा. प्रकाशकाकडे उपलब्ध. मजकूर परत जा.
- उत्तर गोलार्धातील कोळशाच्या खाणीत जे तथाकथित मुळांच्या जमीनीचे अवशेष दाखवतात त्यातून ही काळवंडलेली ‘मुळे’ जमीनीत वाढत नव्हती तर पाण्यामध्ये तरंगत होती असेच सबळ पुरावे मिळतात पाहा: कोल, कॅटास्ट्रॉफी अँड फ्लोरिंग फोरेस्टस ही उप-तांत्रिक (पी. ए एल) व्हिडिओ फिल्म पाहा प्रकाशकाकडे उपलब्ध. मजकूर परत जा.
- हे महाअरिष्ट कसे आले,त्याचे आज कोणते पुरावे उपलब्ध आहेत. त्याचे तपशीलवार वर्णन ‘रेजिंग वॉटर्स’ या व्हिडिओमध्ये पाहा. पान ३८ पाहा. मजकूर परत जा.
- माऊंट सेंट हेलेन्स’ ही व्हिडिओ फिल्म पाहा. मजकूर परत जा.
- या पुस्तकातील सर्व अवतरणांचे ल सर्व अवतरणांचे मूळ संदर्भ द रिवाईज्ड क्वोट बुक” मध्ये विस्ताराने दिले संदर्भ द रिवाईज्ड क्वोट बुक” मध्ये विस्ताराने दिले आहेत. मजकूर परत जा.
- पॅटरसन ह्यांनी ही आणि अशीच आणखी कबुली प्रांजलपणे दिली म्हणून त्यांच्या बसेबरीच्या उत्क्रांतीवादी लोकांनी त्यांच्यावर कडक टीका केली. तेव्हा त्यांनी आपल्या या मतांची धार थोडी बोथट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भांषा तशीच स्पष्ट, अचूक अर्थवादी आहे. मजकूर परत जा.
- ज्याला होमो इरेक्टस म्हटले आहे अशा प्रत्येक अंवशेषाला केव्हा केव्हा हे अवशेष हाडांचे चार दोन तुकडे असतात. हे नाव साजून टिसत नाही. त्यांचे सांगाडे आणि आधुनिक मानवी सांगाडे एकाच वेळी सापडले आहेत. आणि इरेक्टस मध्ये आढळणारी अस्थींची काही लक्षणे जिवंत माननजातीमध्येही आढळतात. मजकूर परत जा.
- पहा एम. लुबेनॉब, बोन्स ऑफ कंटेशन - इन आर एम. मजकूर परत जा.
- जीवशास्त्राच्या दृष्टीने नुसत्या डीएनए या नावाला काही अर्थ नाही. नुसती अक्षरे एकापुढे एक ठेवल्याने त्यातून काही अर्थ, माहिती मिळत नाही. डीएनए ही संज्ञा ज्याला दिली आहे त्यातील रासायनिक अक्षरे’ एका विशिष्ट क्रमाने-व्यवस्थित जुळवली की त्यात माहितीचा सूचनांचा अंतर्भाव होतो आणि ही माहिती पेशीतील गुंतागुंतीच्या यंत्रणेकडून वाचली जाते. व त्या आधारे त्या सजीवाच्या रचनेवर व क्रियेवर नियंत्रण ठेवले जाते. ज्यामुळे डीएनए सिद्ध हाते त्यामधील ‘आंतरिक’ रासायनिक लक्षणांच्या योगे ही व्यवस्था सूचना क्रम ठरत नाही उदा. शाई आणि कागदाचे अणू-रेणू किंवा स्क्रॅबल खेळातील अक्षरे हे एकत्र ठेवल्याने त्यातून आपोआप उत्स्फूर्तपणे विशिष्ट संदेश आकारास येत नाही तसेच हे आहे. डीएनएच्या कोणत्याही रणूचा विशिष्ट व्यवस्थाक्रम ठरलेला असतो कारण त्याची रचना आईवडिलांच्या डीएनए मधाल सूचनांकडून बाह्यतः मार्गदर्शन मिळालेले असते. मजकूर परत जा.
- मनुष्यांच्यामध्ये या दोऱ्या जणू काही गुणसुत्रे नावाच्या २३ तुकड्यात कापलेल्या असतात-पण हा मुद्दा येथे महत्त्वाचा नाही. मजकूर परत जा.
- नैसर्गिक निवडीत सामान्यतः या चुका हे दोष सर्वस्वी काढून टाकले जात नाहीत. आणखी एक सांगायचे म्हणजे हे दोष मातापित्याकडून एकाच वेळी वारशाने आले तरच ते दोष -समस्या म्हणून दिसून येतात. म्हणजेच आपल्या मधील माहितीत हे दोष असूनही आपल्याला त्यांचा त्रास पोचत नाही. खरे तर आपल्या सर्वांच्याच डीएनए मध्ये अशा अनेक चुका आहेत. मजकूर परत जा.
- सिल्क सेल अँनिमिया बाबतीतही हे खरे आहे. लाभदायी आकार बदलाचे प्रमुख उदाहरण म्हणून उत्क्रांती वादी नेहमी य्राचाच आधार घेतात. अशा रोग जंतू वाहकांना मलेरिया होण्याची शक्यता कमी असली तरी त्यांना वारशाने सदोष जीन मिळालेला असतो आणि त्याच्या आधारे फक्त हिमोग्लोबिन विकृत रूपातच तयार होते. आणि हा जीन मातापिता- उभयतांकडून वारशाने मिळालेली असेल तर हाच रोग प्राणघातक ठरतो. मजकूर परत जा.
- फ्रान्सिस्को आयलांचे लेख पाहा, ‘*दि मॅकेनिझम्स् ऑफ इव्होल्यूशन, सायटेफिक अमेरिकन, व्हॉ. २३९, न. ३, सप्टेंबर १९७८, पृष्ट ४८-६१. मजकूर परत जा.
- सुक्ष्म जंतूमध्ये प्रतिजेविकाला (अँटिबायोटिक) होणार्या प्रतिरोधाच्या बाबतीत असेच आहे. प्रतिरोधासाठी आवश्यक ती माहिती इतर जंतूंपासून हस्तांतरित झालेली असते. केव्हा ती दुसर्या प्रकारच्या जंतूंपासूनही मिळालेली असते. काही बाबतीत आकृती बदलामुळे प्रतिरोध वाढतो. उदाहरणार्थ त्वचापटलातून बाह्य द्रव आत नेणारी यंत्रणा कार्यक्षम नसेल तर काही प्रकारची प्रति जेविके जंतूंमध्ये शोषिली जात नाहीत. पण असे रूप बदल सर्वथा कमी प्रतीचे असतात हे पुढील वस्तुस्थितीवरून स्पष्ट होते. प्रतिजेविकांची निवड करण्याचे त्यांना तोंड देण्याचे दडपण दूर झालेली जंतूंचा समूह वेगाने परत पूर्वीच्या संवेदनक्षम स्थितीत येतो. रूपबदल झाल्याने कीटकनाशकांचा प्रतिरोध करण्याची शक्ती वाढल्याचे असेन्ञ आणखी एकतरी उदाहरण आहे. मजकूर परत जा.
- एका ध्वनीफितीवरून सतत पुन्हा पुन्हा दुसऱ्या ध्वनीफीती तयार करणे किंवा एखादा संगणक कार्यक्रम फ्लॉपी डिस्कवर पुन्हा पुन्हा उतरून घेणे ही उदाहरणे देता येतील. यात मूळ माहीतीत बदल होत नाही. पण माहितीची प्रत कमी होण्याकडे पुढे प्रवृत्ती होतेच. उष्मागतीकोच्या (थर्मोडायनामिक्स) दुसऱ्या नियमाचा हा आणखी एक परिणाम आहे असे गणिताने दाखवणे अशक्य आहे. मजकूर परत जा.
- कोणत्याही नव्या नवलाच्या आनुवंशिक माहितीची भर न पडता नवी उपजाती आकारास येते असे एका आघाडीच्या उत्क्रांतीवाद्याने मान्य केले आहे- पाहा लेतिटन आर. द जेनेटिक बोसिस ऑफ इव्होल्युशनरी चेंज (कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस) १९७४, पृ. १८६. मजकूर परत जा.
- हे साधारण तत्त्व सामान्यत: सत्य असल्याचे दिसते, तथापि वैयक्तिक प्रथिनांच्या बाबतीत अनेक अपवाद आढळतात आणि उत्क्रांतीवाद्यांना त्याचा खुलासा करणे अवघड आहे. मजकूर परत जा.
- होमोलॉजी : अन सॉल्व्ह्ड प्रॉब्लेम “लेखक सर गॅव्हिन द बीर”‘ यांचा लेख पाहा. ऑक्सफर्ड बायॉलॉजी रीडर १९७१. मजकूर परत जा.
- पाहा : ग्लोवर, जे. डब्ल्यू. द ह्यूमन व्हमिफॉर्म अपेडिक्स - हा जनरल सर्जन्स रिफ्लेक्शन्स, एक्स - निहिलो टेक्निकल जर्नलव्हा. ३, १९८८, पृ. ३१-३८. मजकूर परत जा.
- ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठातील पाचव्या वर्षाचा अभ्यास करणाऱ्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचे असे ठाम मत होते की मानवी गर्भाला गील म्हणजे कल्ले असतात. परंतु यांच्या तिसर्या वर्षाच्या अभ्यासात असलेल्या गर्भशाख््राच्या पुस्तकात मात्र असे होत नाही. हे स्पष्टपणे सांगितले आहे! (पाहा क्रीएशन मॅगश्रिन व्हा. १४, नं. ३, १९९२, पृ. ४८. आणखी पहा. व्हॉट इजू क्रीएशन सायन्स? पृ. ६, ६१-६८). मजकूर परत जा.
- अधिक तपशिलासाठी “हाउ डिड ऑल द डिफरंट रेसेस अराइज’’ द आन्सर्स बुक पाहा. मजकूर परत जा.
- “केन्स वाइफ” — द आन्सर्स बुक पाहा. मजकूर परत जा.
- इयोब अ. ४० मध्ये बेहेमोथचे वर्णन आहे - हा प्राणी बहुधा डायनोसॉर असावा. पहा व्हॉट हॅपन्ड टु डायनोसॉरस्? द आमन्सर्स बुक. मजकूर परत जा.
- या छापील पानाच्या एकूण गुणधर्मामध्ये यातून प्रकट होणाऱ्या विचारांचाही समावेश आहे. हे एकंदर गुणधर्म शाई आणि कागद यांच्या गुणधर्मांची बेरीज असे म्हणता येत नाही. येथे शाई > कागद -- माहिती असे समीकरण आहे. माहिती म्हणजे या पानावरील अक्षरे जुळवली आहे तो अचूक - विशिष्ट क्रम. मांजर बसले आहे ही माहिती माझ्या मनातून संगणकामध्ये व तेथून लेखणी, शाई या साधनांनी कागदावर लिहिता येते. यात माहिती एका प्रकारच्या बस्तु पदार्थातून दुसर्या प्रकारच्या वस्तूपदार्थात हस्तांतरित केली जाते. पण हस्तांतरण होते ते माहितीचे, पदार्थांचे नाही. मजकूर परत जा.
- देवाने सृष्टीमध्ये पापाचा प्रवेश का होऊ दिला या प्रश्नासंबंधी एक सूचना अशी आहे. “ मनुष्य आणि देव यांच्यामध्ये खरी प्रीती जुळण्यासाठी मनुष्याला निर्माण करतानाच स्वतंत्र इच्छा देणे, ती प्रीती नाकारण्याची इच्छा देणे (म्हणजेच पाप करण्याची क्षमता देणे) अगत्याचे होते. मजकूर परत जा.
Readers’ comments
Comments are automatically closed 14 days after publication.